निसर्ग नियमांप्रमाणे घडणा-या घटनांना ताल, सूर, लयही निरागस साद घालतात, नित्य अनादी एकमेकांचे सांगाती असल्यासारखे. टुगेदर ही अशाच सहजीवनाशी समरस असा आहे. लुई चेंग खेड्यात राहणारा एक स्वयंपाकी. अन त्याला रेल्वे स्टेशनवर वायोलीनसह मिळालेला लहान मुलगा. दोघांच्या नात्यातले वेगवेगळे स्तर या चित्रपटात आहेत.स्वयंपाकी असणा-या चेंग झायोचुनला मोठा वायोलीन वादक बनवायचं ठरवतो.त्यासाठी तो झायोचुनला शहरात घेऊन जातो.
शहरातील धावपळ, स्पर्धा, बेगडीपणाचा छोट्या झायोचुनला वीट येतो.त्याला साध, सरळ गावाकडील राहाण आवडत, त्यात सोबत वायोलीनच्या स्वरांची... वायोलीन शिकण्यासाठी असणारे क्लास अन तिथे बळजबरीने वायोलीन वाजवणारे मुल अन पालकांचं खोट समाधान याचा झायोचुनला फोलपणा वाटतो.यात झायोचुनला मिळालेला एक प्रामाणिक शिक्षक . या स्थितीतही झायोचुनने मोठा वायोलीन वादक व्हाव अस चेंगला वाटत असते. यासाठी तो खूप प्रयत्न करतो.या उलट झायोचुनला यात काहीही स्वारस्य वाटत नाही.तो आपल्या कलेवर मनापासून प्रेम करतो. प्रसुतीच्या वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्रीला शेवटच्या क्षणी झायोचुनचे निरागस सूर हात देतात. अशा अंतर्मनातून पाझरलेल्या सुरांवर तो प्रेम करतो. या दोन पात्रांच्या एकमेकांच्या नात्यातील बंध वैश्विक स्वरुपात अनेक प्रश्न समोर आणतात. समाजातला विसंवाद , कलेचा बाजारूपणा समोर येतो.
टुगेदरचे छायाचित्रण पात्रांच्या व्यक्तिरेखांवर आहे. त्यात दिग्दर्शक दिशा दर्शक आहे. तो कोणत्याही पात्राला आपल्या मनाप्रमाणे वागवत नाही.प्रत्येक दृश्य, त्याच्या देहबोली, संवाद विचार करायला लावतात. टुगेदर बदलत्या काळाचा वेध घेतो. त्यातून सामान्य माणसाची परवड त्याच स्वरुपात मांडतो.
चित्रपटाचे नाव - टुगेदर ( चायनीज )
दिग्दर्शक - चेन कैगे
Thursday, November 18, 2010
Wednesday, November 10, 2010
दिवे लागण्याची वेळ...
अशीच संध्याकाळची
दिवे लागण्याची वेळ
एक डास कानाभोवती
भुणभुणत होता
हळूच त्यानं रक्तही शोषलं
त्याला मग तसंच
चतुराईनं
झटक्यात मुठीच्या खोबणीत घेतलं
तिथंही तो
वेगळाच भुणभुणत होता
इकडून तिकडं. . .
सोडून दिलं त्याला
हिशेब न चुकवता
झर्रकन उडाला तो
वाटलं असं अन् तसं
करायला हवं होतं, नको होतं
थोड्या वेळानं दुसरा आला
पण तो सर्व फोल, निरर्थकपणा वाटला. . .
दिवे लागण्याची वेळ
एक डास कानाभोवती
भुणभुणत होता
हळूच त्यानं रक्तही शोषलं
त्याला मग तसंच
चतुराईनं
झटक्यात मुठीच्या खोबणीत घेतलं
तिथंही तो
वेगळाच भुणभुणत होता
इकडून तिकडं. . .
सोडून दिलं त्याला
हिशेब न चुकवता
झर्रकन उडाला तो
वाटलं असं अन् तसं
करायला हवं होतं, नको होतं
थोड्या वेळानं दुसरा आला
पण तो सर्व फोल, निरर्थकपणा वाटला. . .
Wednesday, September 29, 2010
दोन शब्द
२ ऑक्टोबर बापुना फुलांचे हार, भजन... गायन... वादन आणखी इतर सोपस्कार देऊन आधार देणार. पुनः म्हटलं जाणार ईश्वर ... सबको संमती दे भगवान.
बापूंच्या आत्मचरित्रातच बापूनी सांगितलं आहे, मी तुम्हाला ( जगाला ) नवीन काही शिकवत नाही,
ते तर डोंगर, द-या पर्वता इतकच पुरातन, चिरंतन आहे. सत्य... अहिंसा...
Saturday, September 18, 2010
पाणीसा निर्मल...
झाडांच्या गर्द हिरव्या पानांनी मऊ अन शांत सावली अंथरली होती. पानांसारखाच वर्गही काठोकाठ भरला होता.थोड्या वेळात शांत, निर्मळ झ-यासारखा आवाजान आपला दर्प पसरवला. त्यान आम्हा सर्वांना एकरूप केल होत.तासाचा विषय होता रीपोर्ताज म्हणजे काय? गप्पांच्या स्वरुपात तासाला सुरुवात झाली.
ललित लेखनाच्या अंगाने रीपोर्ताज कसा शब्दबद्ध होतो. पत्रकारितेतील बातमीही कशी रीपोर्ताज असते अस सर्व ... इकडच... तिकडच... सुरु होतं . आम्ही सर्व जण वेगळाच आनंद घेत होतो. कधी कधी कंटाळवाणे वाटणारे तास, अन हा काही तरी वेगळच वाटलं. अगदी तन्मयतेन त्या पांढरी दाढी असणा-या माणसाला सहजतेन अनेक जण मनातले प्रश्न विचारात होते. तोही अगदी तसच , ते कस असत मुलांनो ... इथूनच सुरुवात करायचा. काही जणांचे प्रश्न तर साधेसुधे असायचे, तरी हस-या
....अपूर्ण
Wednesday, September 8, 2010
Teacher ...
Teacher is a literature,
meet and guide easily.
From get a grain of knowledge,
which sowing in our mind .
Always i see him,
like saint of duty and commitment.
But, my puzzle is,
is it real in todays bustling?
In moral and immorality...
Lastly, I believe faithfully,
it is sacred cohesion of
Pupils and Gurus...
Tuesday, August 3, 2010
मुंग्या...
मी स्वत:ला कोंडून घेतलं होतं बंद खोलीत. दोन दिवस अनुभवलं आउटसायडर. त्यातूनच अल्बेर कामुची महती समजली . मी म्हणजे त्यातला मी झालो होतो . माझ्या सभोताली कोणीही नव्हतं , मेरी नाही अन रेमंडही. अगदीच सर्व शून्य. माझ्या रूमची खिडकी मात्र एका बाजूने उघडी होती .पण तिलाही बारीक तारांची जाळी लावलेली होती. संध्याकाळच्या चार पाच वाजता संपवलं आणि स्वत:च सगळ्यातन आउट झालो . तशात पलंगावर स्वत:ला ताणून दिलं. झोप येत नव्हती. कुशी दोन - तीनदा पालटली . पण झोपेची गरज नसताना ताणल होतं मी शरीर रिकामटेकड...
तेवढ्यात भिंतीवर द्वंद्व दिसलं. दहा - पंधरा काळ्या मुंग्या एका ढेकणाचा पाठलाग करत होत्या. त्याला शेडत होत्या. मला गम्मत वाटली. मग मी जुन्या पेपराचा तुकडा घेतला. मनाशीच म्हटलं , हा साला रात्रीचं चांगलच रक्त पितो . याला एकदाच भिंत करूयात, कागदानं दाबलं त्याला. रक्तासह त्याच शरीर चिकटलं भिंतीला. बर वाटलं आपण एवढे तरी शूर असल्याच...थोड्या वेळात बरयाच मुंग्या जमल्या होत्या. त्यानी मृत ढेकणाला माझ्यासमोर ओढून नेलं . मी पण मृत मनानं पाहत होतो.
Sunday, July 25, 2010
माती तर विकालीय
मोठ मोठाली गधडी
लोळणं घेत होती
फसव्या सिंहासनावर बसून.
त्यातला एक दुसरयाला म्हणाला,
आपलं हे पांघरून खूपच छान आहे, नाही का ?
उगाच सत्व जपण्यापेक्षा
इथच आपलं कृत-कृत्य मानाव...
आपण काही कोणाच्या
आईचं घेऊन खाल्लं आहे का ?
आईचं नाव काढल्यावर
त्यातलं एक गधड गरजल
अरे आई माती तर विकालीय
बांधलीय दावणीला...
लोळणं घेत होती
फसव्या सिंहासनावर बसून.
त्यातला एक दुसरयाला म्हणाला,
आपलं हे पांघरून खूपच छान आहे, नाही का ?
उगाच सत्व जपण्यापेक्षा
इथच आपलं कृत-कृत्य मानाव...
आपण काही कोणाच्या
आईचं घेऊन खाल्लं आहे का ?
आईचं नाव काढल्यावर
त्यातलं एक गधड गरजल
अरे आई माती तर विकालीय
बांधलीय दावणीला...
वाडा कोसळलेला
मर्कटराव गाढ झोपेतन ताडकन उठले
अन ,
जोर -जोराने खोदू लागले
भूतकाळ...
झाल्याच ,नव्हत्याच , होत्याच
शोधत होते
घाम टिबटिबला कपाळावर
तशीच बोट ही गोंजारली
त्यांनी जाड भरड्या केसातून ...
मर्कटराव भूत, वर्तमान, भविष्यासाठी
खोदत होते ...
पाळ-मूळ शोधत होते
सर्वच माती- मातीच होती
हाडांची-काडांची आयुष्यांची ...
ओथंबलेल्या चार क्षणासाठी
मर्कटराव माळरानावरच्या
वाड्यावर विसावले
आनंदाचे ,दुःखाचे चार क्षण आठवले
हसणारी ...खिदळणारी चिमुकली पावलं आठवली ...
दुसरयाच क्षणी उभारलेला वाडा कोसळलेला दिसला...
पंजोबापासूनचे साग, चिरयाचा दगड तसाच होता...
मर्कटराव खिन्नपणाने पाहत होते ,
गात होते आजीचा स्वर...
गाता गाताच झोपी गेले.
अंथरुणाला बोटांचा स्पर्श झाला,
खिडकीतन पक्ष्यांची
किल बिल ऐकू आली..
दारं अजून बंदच होती
मर्कटराव वर्तमानात होते...
अन ,
जोर -जोराने खोदू लागले
भूतकाळ...
झाल्याच ,नव्हत्याच , होत्याच
शोधत होते
घाम टिबटिबला कपाळावर
तशीच बोट ही गोंजारली
त्यांनी जाड भरड्या केसातून ...
मर्कटराव भूत, वर्तमान, भविष्यासाठी
खोदत होते ...
पाळ-मूळ शोधत होते
सर्वच माती- मातीच होती
हाडांची-काडांची आयुष्यांची ...
ओथंबलेल्या चार क्षणासाठी
मर्कटराव माळरानावरच्या
वाड्यावर विसावले
आनंदाचे ,दुःखाचे चार क्षण आठवले
हसणारी ...खिदळणारी चिमुकली पावलं आठवली ...
दुसरयाच क्षणी उभारलेला वाडा कोसळलेला दिसला...
पंजोबापासूनचे साग, चिरयाचा दगड तसाच होता...
मर्कटराव खिन्नपणाने पाहत होते ,
गात होते आजीचा स्वर...
गाता गाताच झोपी गेले.
अंथरुणाला बोटांचा स्पर्श झाला,
खिडकीतन पक्ष्यांची
किल बिल ऐकू आली..
दारं अजून बंदच होती
मर्कटराव वर्तमानात होते...
Tuesday, July 13, 2010
पावलांचा गोलाकार...
चिंब नाद
पावलांची साद
लगबग भगव्याची
टप-टप सरी
ओढ माऊलीची...
दूर माळरानावर
विसावला गजर
पताक्यांचे निशाण
निळ्या शुभ्र ढगांची राखण...
वाळलेल्या
रंगी बेरंगी कपड्यांचा थवा
झोका घेतो मनसोक्त ...
पूर्वेस सकाळ पहारी
हळूच डोकावी ज्ञानतेजू
ताल मृदुंगाचा गजर
आकाशभरी अंतकरण ...
चिखल मातीत
अनंत पावलांचा मळा फुले
विठू नाचे त्यासंगे मनसोक्त ...
सगळा त्राण विसावला
माउली गजरात
माय-बाप मुक्त
जगण्यातल्या आगीतन ...
फुगडीच्या गरगरीत
हातांची गुंफण..
गर- गर , फर-फर
पावलांचा गोलाकार...
माउली भेटे मातीत...
पावलांची साद
लगबग भगव्याची
टप-टप सरी
ओढ माऊलीची...
दूर माळरानावर
विसावला गजर
पताक्यांचे निशाण
निळ्या शुभ्र ढगांची राखण...
वाळलेल्या
रंगी बेरंगी कपड्यांचा थवा
झोका घेतो मनसोक्त ...
पूर्वेस सकाळ पहारी
हळूच डोकावी ज्ञानतेजू
ताल मृदुंगाचा गजर
आकाशभरी अंतकरण ...
चिखल मातीत
अनंत पावलांचा मळा फुले
विठू नाचे त्यासंगे मनसोक्त ...
सगळा त्राण विसावला
माउली गजरात
माय-बाप मुक्त
जगण्यातल्या आगीतन ...
फुगडीच्या गरगरीत
हातांची गुंफण..
गर- गर , फर-फर
पावलांचा गोलाकार...
माउली भेटे मातीत...
Wednesday, May 26, 2010
लंप्या...
प्रत्येकाचं टिंब टिंब .... ओळ , रेष, उभी आडवी, अक्षर आडवळणच , खुलं मनमोकळ निर्मल असच काही तरी , हे झाल अक्षराचं एका निर्मितीच आत्ता थोड जगण लम्प्याच . असच अगदी तुमच्या आमच्या सारखं त्याच्या प्रत्येक हालचालीत स्मरण विस्मरणतील अनुभवांची पानं सापडत जातात . कोवळी मऊ हिरवी शहर गर्द ताजी टवटवीत सुकलेली . तरीही जुन्या वहीतलं सुकलेल जाळीदार पानं कित्येक वर्षानी सापडल्यावर ताजच वटव असं. त्यातली कोणतीही कोरडी गुंफलेली जाळीदार शिरा वेगळाच जुना नव्याचं पाझर देऊन जाते अशी ...
झुंबर च्या मुख पृष्टावरचा लंप्या (लंपन) वैश्विक वाटायला लागतो. झुंबरवर चंद्र आजूबाजूला चांदण्या, तारे पृथ्वीवरील डोंगर चढ उतारावरच्या लयीत कौलारू घर, झाड . गुडघ्यभोवती दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफून रेलून बसलेला लंप्या काय बर विचार करत असेल ? नक्कीच वेगळा ...
झुंबर च्या मुख पृष्टावरचा लंप्या (लंपन) वैश्विक वाटायला लागतो. झुंबरवर चंद्र आजूबाजूला चांदण्या, तारे पृथ्वीवरील डोंगर चढ उतारावरच्या लयीत कौलारू घर, झाड . गुडघ्यभोवती दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफून रेलून बसलेला लंप्या काय बर विचार करत असेल ? नक्कीच वेगळा ...
Sunday, May 23, 2010
आऊटसाईडर
भुरक्या- भुरक्या रंगानं आकाश सभोवार भरलं होतं आजूबाजूला...
झाडे, हवेत मावळतीकडे वा-याने डुलत होती ...
नाजुकसं पान हळूच कामूच्या अंगावर पडलं ...
तरीही पानाला जाग आली नाही
आई हळूच म्हणाली बाळ दमलास तू ...
थोडा इसवा घे बरं
नाही तर झुरके तरी ढगांचे ...
झाडे, हवेत मावळतीकडे वा-याने डुलत होती ...
नाजुकसं पान हळूच कामूच्या अंगावर पडलं ...
तरीही पानाला जाग आली नाही
आई हळूच म्हणाली बाळ दमलास तू ...
थोडा इसवा घे बरं
नाही तर झुरके तरी ढगांचे ...
Wednesday, March 31, 2010
जीनं बदमाश
अर्ध पोटभर खावं
घोटभर प्यावं
उताणं पडावं
रस्त्याच्या कडेला ...
वाटल तर फिरावं
इकडं- तिकडं
जीनं बदमाश
असल्याचं म्हणत
थंडीत, पावसात हुडहुडावं
उष्म्यानं तंगड्या
ताणून मरावं ...
पालिकेच्या गाडीतन
हिंदळत जावं ...
अन मुक्काम,
शवागारात बेवारस ...
-------------------------
फोटो येथून घेतला आहे.
घोटभर प्यावं
उताणं पडावं
रस्त्याच्या कडेला ...
वाटल तर फिरावं
इकडं- तिकडं
जीनं बदमाश
असल्याचं म्हणत
थंडीत, पावसात हुडहुडावं
उष्म्यानं तंगड्या
ताणून मरावं ...
पालिकेच्या गाडीतन
हिंदळत जावं ...
अन मुक्काम,
शवागारात बेवारस ...
-------------------------
फोटो येथून घेतला आहे.
रस्ता
ते सारखं फिरत होत
शून्यापासून चोवीस पर्यंत
अन पुन्हा तसंच...
लकडी पुलाच्या कमानीतच
झानकन जाग आली ...
काल परवाचा पेपर न्याहाळत
काय राव काय म्हणताय ?
स्वताशीच पुटपुटला ,
जो तो आपलंच
घोडं दामटवत असतो ...
समोरचा रस्ता ही उलटा- सुलटा होत
वाहत होता ...
शून्यापासून चोवीस पर्यंत
अन पुन्हा तसंच...
लकडी पुलाच्या कमानीतच
झानकन जाग आली ...
काल परवाचा पेपर न्याहाळत
काय राव काय म्हणताय ?
स्वताशीच पुटपुटला ,
जो तो आपलंच
घोडं दामटवत असतो ...
समोरचा रस्ता ही उलटा- सुलटा होत
वाहत होता ...
Tuesday, March 9, 2010
सुन्न केलं
काल परवाच्या तुझ्या जाण्यानं सुन्न केलं
तू गेल्याच तुझ्या पंथातल्या कोणालाही सोयर- सुतक नाही ...
सगळ काही बकालच सर्जनशील तेच तर अगदीच
पण तू जायला नको होतास ...
अरे पण आता सिस्टीमला जाब कोण विचारणार जाबच जाऊ देत पण
येणा-या प्रत्येक उश:कालाला उत्तरासाठी धडपडावं लागेल
तू कोणत्या विचाराने शरीर त्यागलंस
तू त्या खोल गर्ततेत
अजूनही वेदनेने विव्हळत असशील
अरे पण काय करणार
आमच्या संवेदनाच षंढ झाल्या रे
काफ्काची एखादी गोष्ट वाचत असल्यासारखं
पेपरात बातमी आली,
तरुण लेखकाची आत्महत्या
तू गेल्याच तुझ्या पंथातल्या कोणालाही सोयर- सुतक नाही ...
सगळ काही बकालच सर्जनशील तेच तर अगदीच
पण तू जायला नको होतास ...
अरे पण आता सिस्टीमला जाब कोण विचारणार जाबच जाऊ देत पण
येणा-या प्रत्येक उश:कालाला उत्तरासाठी धडपडावं लागेल
तू कोणत्या विचाराने शरीर त्यागलंस
तू त्या खोल गर्ततेत
अजूनही वेदनेने विव्हळत असशील
अरे पण काय करणार
आमच्या संवेदनाच षंढ झाल्या रे
काफ्काची एखादी गोष्ट वाचत असल्यासारखं
पेपरात बातमी आली,
तरुण लेखकाची आत्महत्या
Subscribe to:
Posts (Atom)

