Friday, January 14, 2011

वस्तूचं मर्म

पिंपळाच्या झाडाखाली


बसलेल्या वस्तूला

एक जण म्हणाला,

तुम्ही महान आहात

वस्तू - मी भिकारी आहे .

पुन्हा एक जण म्हणाला,

तुमचा पेहराव, हास्य छान आहे

वस्तू- ते शाप आहे.

झाडाची पानं हलली

वस्तूच्या पापण्यातून त्याला

डोळ्यातली हिरवळ दिसली.

पुन्हा पानं हलली

वस्तू चालू लागली

पायवाटेनं...

एक जण पाहत होता

वस्तूचं मर्म शोधत होता...

Thursday, November 18, 2010

वायोलीन

   निसर्ग नियमांप्रमाणे घडणा-या घटनांना ताल, सूर, लयही निरागस साद घालतात, नित्य अनादी एकमेकांचे सांगाती असल्यासारखे. टुगेदर ही अशाच सहजीवनाशी समरस असा आहे. लुई चेंग खेड्यात राहणारा एक स्वयंपाकी. अन त्याला रेल्वे स्टेशनवर वायोलीनसह  मिळालेला लहान मुलगा. दोघांच्या नात्यातले वेगवेगळे स्तर या चित्रपटात आहेत.स्वयंपाकी असणा-या  चेंग झायोचुनला मोठा वायोलीन वादक बनवायचं ठरवतो.त्यासाठी तो झायोचुनला शहरात घेऊन जातो.
    शहरातील धावपळ, स्पर्धा, बेगडीपणाचा छोट्या  झायोचुनला वीट येतो.त्याला साध, सरळ गावाकडील राहाण आवडत, त्यात सोबत वायोलीनच्या स्वरांची... वायोलीन शिकण्यासाठी असणारे क्लास अन तिथे बळजबरीने वायोलीन वाजवणारे मुल अन पालकांचं खोट समाधान याचा झायोचुनला फोलपणा वाटतो.यात झायोचुनला मिळालेला एक प्रामाणिक शिक्षक . या स्थितीतही झायोचुनने मोठा वायोलीन वादक व्हाव अस चेंगला वाटत असते.  यासाठी तो खूप प्रयत्न करतो.या उलट झायोचुनला यात काहीही स्वारस्य वाटत नाही.तो आपल्या कलेवर मनापासून प्रेम करतो. प्रसुतीच्या वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्रीला शेवटच्या क्षणी झायोचुनचे निरागस सूर हात देतात. अशा अंतर्मनातून पाझरलेल्या सुरांवर तो प्रेम करतो. या दोन पात्रांच्या एकमेकांच्या नात्यातील बंध वैश्विक स्वरुपात अनेक प्रश्न समोर आणतात. समाजातला विसंवाद , कलेचा बाजारूपणा समोर येतो.
   टुगेदरचे छायाचित्रण पात्रांच्या व्यक्तिरेखांवर आहे. त्यात दिग्दर्शक दिशा दर्शक आहे. तो कोणत्याही पात्राला आपल्या मनाप्रमाणे वागवत नाही.प्रत्येक दृश्य, त्याच्या देहबोली, संवाद विचार करायला लावतात. टुगेदर बदलत्या काळाचा वेध घेतो. त्यातून सामान्य माणसाची परवड त्याच स्वरुपात मांडतो.

चित्रपटाचे नाव - टुगेदर ( चायनीज )
दिग्दर्शक - चेन कैगे

Wednesday, November 10, 2010

दिवे लागण्याची वेळ...

अशीच संध्याकाळची


दिवे लागण्याची वेळ

एक डास कानाभोवती

भुणभुणत होता

हळूच त्यानं रक्तही शोषलं

त्याला मग तसंच

चतुराईनं

झटक्यात मुठीच्या खोबणीत घेतलं

तिथंही तो

वेगळाच भुणभुणत होता

इकडून तिकडं. . .

सोडून दिलं त्याला

हिशेब न चुकवता

झर्रकन उडाला तो

वाटलं असं अन् तसं

करायला हवं होतं, नको होतं

थोड्या वेळानं दुसरा आला

पण तो सर्व फोल, निरर्थकपणा वाटला. . .

Wednesday, September 29, 2010

दोन शब्द

       
पुन्हा  एकदा यशाला नवीन अपयशाची जोड दिली जाणार. अस म्हणतात की,  Mohandas was ultimately killed, but we People ...याची उत्तर दिसतात, तुमच्या- आमच्या वागण्यात, बोलण्यात सर्वत्र...

        २ ऑक्टोबर बापुना फुलांचे हार, भजन... गायन... वादन आणखी इतर सोपस्कार देऊन आधार देणार. पुनः म्हटलं जाणार ईश्वर ... सबको संमती दे  भगवान.

     बापूंच्या आत्मचरित्रातच  बापूनी सांगितलं आहे, मी तुम्हाला ( जगाला ) नवीन काही शिकवत नाही,
ते तर डोंगर, द-या पर्वता इतकच पुरातन, चिरंतन आहे. सत्य... अहिंसा...    


Saturday, September 18, 2010

पाणीसा निर्मल...

     


     झाडांच्या गर्द हिरव्या पानांनी मऊ अन शांत सावली अंथरली होती. पानांसारखाच वर्गही काठोकाठ भरला होता.थोड्या वेळात शांत, निर्मळ झ-यासारखा आवाजान आपला दर्प पसरवला. त्यान आम्हा सर्वांना एकरूप केल होत.तासाचा विषय होता रीपोर्ताज म्हणजे काय? गप्पांच्या स्वरुपात तासाला सुरुवात झाली.

    ललित लेखनाच्या अंगाने रीपोर्ताज  कसा शब्दबद्ध होतो. पत्रकारितेतील बातमीही कशी रीपोर्ताज असते अस सर्व ... इकडच... तिकडच... सुरु होतं . आम्ही सर्व जण वेगळाच आनंद घेत होतो. कधी कधी कंटाळवाणे वाटणारे तास, अन हा काही तरी वेगळच वाटलं. अगदी तन्मयतेन त्या पांढरी दाढी असणा-या माणसाला सहजतेन अनेक जण मनातले प्रश्न विचारात होते. तोही अगदी तसच , ते कस असत मुलांनो ... इथूनच सुरुवात करायचा. काही जणांचे प्रश्न तर साधेसुधे असायचे, तरी हस-या
....अपूर्ण


















Wednesday, September 8, 2010

Teacher ...

Teacher is a literature,
meet and guide easily.
From get a grain of knowledge,
which sowing in our mind .
Always i see him,
like saint of duty and commitment.
But, my puzzle is,
is it real in todays bustling?
In moral and immorality...
Lastly, I believe faithfully,
it is sacred cohesion of 
Pupils and Gurus...

Tuesday, August 3, 2010

मुंग्या...



  मी स्वत:ला कोंडून घेतलं  होतं बंद खोलीत. दोन दिवस अनुभवलं आउटसायडर. त्यातूनच अल्बेर कामुची महती समजली . मी म्हणजे त्यातला मी झालो होतो . माझ्या सभोताली कोणीही नव्हतं , मेरी नाही अन रेमंडही. अगदीच सर्व शून्य. माझ्या रूमची खिडकी मात्र एका बाजूने उघडी होती .पण तिलाही बारीक तारांची जाळी लावलेली होती. संध्याकाळच्या  चार पाच वाजता संपवलं आणि स्वत:च सगळ्यातन आउट झालो . तशात पलंगावर स्वत:ला ताणून दिलं. झोप येत नव्हती. कुशी दोन - तीनदा पालटली . पण झोपेची गरज नसताना ताणल होतं मी शरीर रिकामटेकड...

     तेवढ्यात भिंतीवर द्वंद्व दिसलं. दहा - पंधरा काळ्या मुंग्या एका ढेकणाचा पाठलाग करत होत्या. त्याला शेडत होत्या. मला गम्मत वाटली. मग मी जुन्या पेपराचा तुकडा घेतला. मनाशीच म्हटलं , हा  साला  रात्रीचं  चांगलच रक्त पितो . याला एकदाच भिंत करूयात, कागदानं  दाबलं त्याला. रक्तासह त्याच शरीर चिकटलं  भिंतीला. बर वाटलं आपण एवढे तरी शूर असल्याच...थोड्या वेळात बरयाच मुंग्या जमल्या होत्या. त्यानी मृत ढेकणाला माझ्यासमोर ओढून नेलं . मी पण मृत मनानं पाहत होतो.