मी स्वत:ला कोंडून घेतलं होतं बंद खोलीत. दोन दिवस अनुभवलं आउटसायडर. त्यातूनच अल्बेर कामुची महती समजली . मी म्हणजे त्यातला मी झालो होतो . माझ्या सभोताली कोणीही नव्हतं , मेरी नाही अन रेमंडही. अगदीच सर्व शून्य. माझ्या रूमची खिडकी मात्र एका बाजूने उघडी होती .पण तिलाही बारीक तारांची जाळी लावलेली होती. संध्याकाळच्या चार पाच वाजता संपवलं आणि स्वत:च सगळ्यातन आउट झालो . तशात पलंगावर स्वत:ला ताणून दिलं. झोप येत नव्हती. कुशी दोन - तीनदा पालटली . पण झोपेची गरज नसताना ताणल होतं मी शरीर रिकामटेकड...
तेवढ्यात भिंतीवर द्वंद्व दिसलं. दहा - पंधरा काळ्या मुंग्या एका ढेकणाचा पाठलाग करत होत्या. त्याला शेडत होत्या. मला गम्मत वाटली. मग मी जुन्या पेपराचा तुकडा घेतला. मनाशीच म्हटलं , हा साला रात्रीचं चांगलच रक्त पितो . याला एकदाच भिंत करूयात, कागदानं दाबलं त्याला. रक्तासह त्याच शरीर चिकटलं भिंतीला. बर वाटलं आपण एवढे तरी शूर असल्याच...थोड्या वेळात बरयाच मुंग्या जमल्या होत्या. त्यानी मृत ढेकणाला माझ्यासमोर ओढून नेलं . मी पण मृत मनानं पाहत होतो.