निसर्ग नियमांप्रमाणे घडणा-या घटनांना ताल, सूर, लयही निरागस साद घालतात, नित्य अनादी एकमेकांचे सांगाती असल्यासारखे. टुगेदर ही अशाच सहजीवनाशी समरस असा आहे. लुई चेंग खेड्यात राहणारा एक स्वयंपाकी. अन त्याला रेल्वे स्टेशनवर वायोलीनसह मिळालेला लहान मुलगा. दोघांच्या नात्यातले वेगवेगळे स्तर या चित्रपटात आहेत.स्वयंपाकी असणा-या चेंग झायोचुनला मोठा वायोलीन वादक बनवायचं ठरवतो.त्यासाठी तो झायोचुनला शहरात घेऊन जातो.
शहरातील धावपळ, स्पर्धा, बेगडीपणाचा छोट्या झायोचुनला वीट येतो.त्याला साध, सरळ गावाकडील राहाण आवडत, त्यात सोबत वायोलीनच्या स्वरांची... वायोलीन शिकण्यासाठी असणारे क्लास अन तिथे बळजबरीने वायोलीन वाजवणारे मुल अन पालकांचं खोट समाधान याचा झायोचुनला फोलपणा वाटतो.यात झायोचुनला मिळालेला एक प्रामाणिक शिक्षक . या स्थितीतही झायोचुनने मोठा वायोलीन वादक व्हाव अस चेंगला वाटत असते. यासाठी तो खूप प्रयत्न करतो.या उलट झायोचुनला यात काहीही स्वारस्य वाटत नाही.तो आपल्या कलेवर मनापासून प्रेम करतो. प्रसुतीच्या वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्रीला शेवटच्या क्षणी झायोचुनचे निरागस सूर हात देतात. अशा अंतर्मनातून पाझरलेल्या सुरांवर तो प्रेम करतो. या दोन पात्रांच्या एकमेकांच्या नात्यातील बंध वैश्विक स्वरुपात अनेक प्रश्न समोर आणतात. समाजातला विसंवाद , कलेचा बाजारूपणा समोर येतो.
टुगेदरचे छायाचित्रण पात्रांच्या व्यक्तिरेखांवर आहे. त्यात दिग्दर्शक दिशा दर्शक आहे. तो कोणत्याही पात्राला आपल्या मनाप्रमाणे वागवत नाही.प्रत्येक दृश्य, त्याच्या देहबोली, संवाद विचार करायला लावतात. टुगेदर बदलत्या काळाचा वेध घेतो. त्यातून सामान्य माणसाची परवड त्याच स्वरुपात मांडतो.
चित्रपटाचे नाव - टुगेदर ( चायनीज )
दिग्दर्शक - चेन कैगे
Thursday, November 18, 2010
Wednesday, November 10, 2010
दिवे लागण्याची वेळ...
अशीच संध्याकाळची
दिवे लागण्याची वेळ
एक डास कानाभोवती
भुणभुणत होता
हळूच त्यानं रक्तही शोषलं
त्याला मग तसंच
चतुराईनं
झटक्यात मुठीच्या खोबणीत घेतलं
तिथंही तो
वेगळाच भुणभुणत होता
इकडून तिकडं. . .
सोडून दिलं त्याला
हिशेब न चुकवता
झर्रकन उडाला तो
वाटलं असं अन् तसं
करायला हवं होतं, नको होतं
थोड्या वेळानं दुसरा आला
पण तो सर्व फोल, निरर्थकपणा वाटला. . .
दिवे लागण्याची वेळ
एक डास कानाभोवती
भुणभुणत होता
हळूच त्यानं रक्तही शोषलं
त्याला मग तसंच
चतुराईनं
झटक्यात मुठीच्या खोबणीत घेतलं
तिथंही तो
वेगळाच भुणभुणत होता
इकडून तिकडं. . .
सोडून दिलं त्याला
हिशेब न चुकवता
झर्रकन उडाला तो
वाटलं असं अन् तसं
करायला हवं होतं, नको होतं
थोड्या वेळानं दुसरा आला
पण तो सर्व फोल, निरर्थकपणा वाटला. . .
Subscribe to:
Posts (Atom)