चिंब नाद
पावलांची साद
लगबग भगव्याची
टप-टप सरी
ओढ माऊलीची...
दूर माळरानावर
विसावला गजर
पताक्यांचे निशाण
निळ्या शुभ्र ढगांची राखण...
वाळलेल्या
रंगी बेरंगी कपड्यांचा थवा
झोका घेतो मनसोक्त ...
पूर्वेस सकाळ पहारी
हळूच डोकावी ज्ञानतेजू
ताल मृदुंगाचा गजर
आकाशभरी अंतकरण ...
चिखल मातीत
अनंत पावलांचा मळा फुले
विठू नाचे त्यासंगे मनसोक्त ...
सगळा त्राण विसावला
माउली गजरात
माय-बाप मुक्त
जगण्यातल्या आगीतन ...
फुगडीच्या गरगरीत
हातांची गुंफण..
गर- गर , फर-फर
पावलांचा गोलाकार...
माउली भेटे मातीत...
Chandu,
ReplyDeleteBest.
Thank you Avadhoot.
ReplyDelete