अर्ध पोटभर खावं
घोटभर प्यावं
उताणं पडावं
रस्त्याच्या कडेला ...
वाटल तर फिरावं
इकडं- तिकडं
जीनं बदमाश
असल्याचं म्हणत
थंडीत, पावसात हुडहुडावं
उष्म्यानं तंगड्या
ताणून मरावं ...
पालिकेच्या गाडीतन
हिंदळत जावं ...
अन मुक्काम,
शवागारात बेवारस ...
-------------------------
फोटो येथून घेतला आहे.

चंदू
ReplyDeleteफोटो छान आहे
ब्लॉग पण सुंदर आहे
thanks
ReplyDelete