पिंपळाच्या झाडाखाली
बसलेल्या वस्तूला
एक जण म्हणाला,
तुम्ही महान आहात
वस्तू - मी भिकारी आहे .
पुन्हा एक जण म्हणाला,
तुमचा पेहराव, हास्य छान आहे
वस्तू- ते शाप आहे.
झाडाची पानं हलली
वस्तूच्या पापण्यातून त्याला
डोळ्यातली हिरवळ दिसली.
पुन्हा पानं हलली
वस्तू चालू लागली
पायवाटेनं...
एक जण पाहत होता
वस्तूचं मर्म शोधत होता...
हे गौतम बुद्धांबद्दल आहे ना?
ReplyDeleteस्नेहल , ठरवून असं काही लिहिलं नाही. जस वाटलं तसं.
ReplyDelete