काल परवाच्या तुझ्या जाण्यानं सुन्न केलं
तू गेल्याच तुझ्या पंथातल्या कोणालाही सोयर- सुतक नाही ...
सगळ काही बकालच सर्जनशील तेच तर अगदीच
पण तू जायला नको होतास ...
अरे पण आता सिस्टीमला जाब कोण विचारणार जाबच जाऊ देत पण
येणा-या प्रत्येक उश:कालाला उत्तरासाठी धडपडावं लागेल
तू कोणत्या विचाराने शरीर त्यागलंस
तू त्या खोल गर्ततेत
अजूनही वेदनेने विव्हळत असशील
अरे पण काय करणार
आमच्या संवेदनाच षंढ झाल्या रे
काफ्काची एखादी गोष्ट वाचत असल्यासारखं
पेपरात बातमी आली,
तरुण लेखकाची आत्महत्या
पोस्ट टाकलीस हे चांगलं केलंस. जे शब्द व्यवस्थित उमटले नाहीयेत, ते तुला परत 'एडीट'मध्ये जाऊन ठीकठाक करता येतील. बाकी चांगलं.
ReplyDeleteyes avadhootji
ReplyDelete